आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड-  बारावीत शिकणाऱ्या  तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यावर बलात्कार केला. यातून तरुणी ८ महिन्यांची गरोदर राहिली. सदर तरुणीच्या तक्रारीवरून बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील  नीलेश  ढास याच्यावर नेकनूर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला अाहे.  बीड न्यायालयाने अाराेपीस १५ मार्चपर्यंतची  पोलिस काेठडी सुनावली अाहे.  

 

महाविद्यालयात येण्या-जाण्या दरम्यान नीलेश शहादेव ढास (रा.  लिंबागणेश, ता. बीड) या तरुणाची सदर तरुणीशी अाेळख  झाली. त्याने २ अाॅगस्ट २०१७ राेजी  लग्नाचे आमिष दाखवून  देव दर्शनासाठी कपिलधार येथे नेऊन तरुणीवर मांजरसुंबा शिवार  परिसरात बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिली.  तिने लग्नाचा  हट्ट धरला असता तरुणाने नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...