आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार, पाेस्काेनुसार चालणार खटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सय्यद बबलू सय्यद अशरफ (३०) याला सोमवारी (दि.२३) येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पाेलिसांनी सय्यदवर अपराध क्र.१५३/२०१८ कलम ३६३,३७६(२)(अाय), ३७७ भादंविसह पाेस्काे अॅक्टनुसार गुन्हा नाेंदवला अाहे.  मात्र केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या वटहुकमाच्या अाधारे त्याच्यावर खटला चालवला जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.  


गांधी पार्क भागात खरेदीसाठी आलेल्या दांपत्याच्या सात वर्षीय मुलीस सांभाळण्याच्या बहाण्याने सय्यद बबलू याने पळवले होते. अाराेपीने रात्री उशिरा पूर्णा तालुक्यातील एका आखाड्याच्या परिसरात त्या मुलीवर अत्याचार करून तिला तेथेच सोडून पळ काढला हाेता. या प्रकरणी पाेलिसांनी सय्यदला अटक केली.

 

फाशीची तरतूद
सय्यदवर २०१२ च्या पाेस्काे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला अाहे. मात्र अाता नवीन अध्यादेशानुसार १२ वर्षांच्या अातील मुलीवर बलात्कार केल्यास अाराेपीला फाशीची शिक्षा हाेऊ शकते. अाराेपी सय्यदविराेधात नवीन अध्यादेशानुसार खटला चालवला जाईल, अशी माहिती पाेलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...