आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना : ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून खून; गावातीलच तरुणाचे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर- गावाच्या मध्यवस्तीत पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर गावातीलच तरुणाने तोंड दाबून बलात्कार करत खून करण्यात केल्याची घटना राजेवाडी येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रतन महाजन गुसिंगे (३०) या संशयित आरोपीला बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


पीडित महिलेची मुले ही पुणे येथे नोकरीस असतात. यामुळे ही महिला घरी एकटीच असते. सोमवारी सकाळी हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांना पाहताच आरोपीने नग्नावस्थेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमावाने त्याला ताब्यात घेतले. यानंतर नागरिकांनी या घटनेविषयी बदनापूर पोलिस ठाण्याला ही माहिती कळवली. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...