आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मजूर मुलीवर रिक्षाचालकाचा बलात्कार; अत्याचारातून गर्भवती राहिल्याने बाळाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- कापूस वेचणीसाठी ने- आण करणाऱ्या रिक्षाचालकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन मजूर मुलीवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी बीड तालुक्यातील कुर्ला येथे उघडकीस आली. अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या पीडित मुलीने ३ जुलै रोजी बाळाला जन्म दिला. 


शहरातील १४ वर्षीय मुलगी कापूस वेचणीचे काम करत असे. सुभाष जाधव (३०, रा. कुर्ला) हा बीडमधून मजुरांना कुर्ला येथे कापूस वेचणीसाठी ने- आण करायचा. यातून त्याची अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. यातून त्याने कुर्ला शिवारातील कापसाच्या शेतात मुलीवर ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत तीन वेळा अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली. ३ जुलै रोजी पोटात दुखत असल्याने कुटुंबाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ती गरोदर असून तिला प्रसववेदना होत असल्याचे सांगितले. त्याच रात्री तिने मुलीला जन्म दिला. नातेवाइकांनी विचारपूस केल्यावर खरा प्रकार समोर आला. ग्रामीण ठाण्यात गुरुवारी रात्री बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ अन्वये रिक्षाचालक सुभाष महादेव जाधव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. पोहेकॉ भागवत शेलार यांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी सुभाष जाधवला कुर्ला येथून अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...