आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा रुग्णालयास 19.80 लाख रुपयांच्या 3 डायलिसिस मशीन भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - मुंबई येथील मंजू विनोद आसराणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय आसराणी यांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला तीन डायलिसिस मशीन भेट दिल्या अाहेत. त्यांची किंमत १९.८० लाख रुपये आहे. पाच मशीन भेट देण्याचा त्यांचा मनोदय असून, आणखी दोन मशीन भेट देणार आहे.

 

साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात डायलिसिस मशिनची संख्या कमी व रुग्णाची संख्या अधिक असा विरोधाभास असल्याने रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. मशीनची संख्या वाढल्याने रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. भेट दिलेल्या या तीन मशीनचे पूजन दानशूर भाविक परिवाराच्या हस्ते करण्यात आले आहे. जपान येथील अद्ययावत मशीन असून हॉस्पिटलच्या डायलिसिस रूममध्ये बसवण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...