आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री; लातूरच्या ग्राहक पंचायतीची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील मेडिकल दुकानातून जेनेरिक मेडिसीनची जास्तीच्या दरात विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. 


संबंधित जागृती मेडिकल स्टोअरवर कायदेशीर कारवाई करून गोरगरीब रुग्णांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना जेनेरिक औषधांची जास्त दराने विक्री होत आहे. जी औषधे बाजारात कमी दराने मिळतात तीच औषधे महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या जागृती मेडिकल स्टोअरमधून जास्त दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


लातूरच्या शासकीय रुग्णालयात रोज हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या सामान्य, गरीब रुग्णांची अशा प्रकारे राजरोस लूट सुरू आहे. हे अन्यायकारक असून ही लूट तत्काळ थांबवावी व जागृती मेडिकल स्टोअरवर कायदेशीर कारवाई करून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी या निवेदनात  करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हाध्यक्ष महेश ढवळे  यांच्यासह जिल्हा संघटक दत्तात्रय मिरकले पाटील, तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, संघटक धनराज जाधव, शहराध्यक्ष इस्माईल शेख, उपाध्यक्ष प्रताप भोसले यांनी हे निवेदन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...