आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूचे ट्रॅक्टर भरण्यासाठी तलाठ्याला मोबाइलवरून धमकावले; अंबडला गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - अवैध वाळू उपसा करणारे धरलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी मोबाइलवरून तलाठ्यास धमकी दिल्याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाळू माफियाची आणि तलाठ्यातील संवादाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्याने  पुन्हा वाळू माफिया शासकीय अधिकाऱ्यांतील संबंधांविषयी चर्चेला पेव फुटले आहे.  


तलाठी संजय कुलकर्णी हे घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली राठी सज्जामध्ये कार्यरत आहेत. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंतरवाली गावाच्या बाजूच्या नदीत वाळू उपशासंदर्भात कारवाईसाठी गस्त घालत असताना एक ट्रॅक्टर दिसले. या ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना त्यांच्या मोबाइलवर  कॉल आला. हे ट्रॅक्टर सोडण्यासाठी समोरून त्यांना धमकी दिली गेली.  या प्रकरणी  अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...