आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या धोरणामुळेच साखर उद्योग अडचणीत, शरद पवार यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब- सरकार निर्यात धोरणात वारंवार बदल करत आहे. यामुळे विशेषतः साखर उद्योग अडचणीत येत असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.


रांजणी येथील एन साई नॅचरल शुगर कारखाना येथे चालू गळीप हंगामातील १४ लाख, ११ हजार १११ व्या पोत्याचे पुजन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल शिवराज  पाटील चाकूरकर, तर प्रमुख पाहूने म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार दिलीपराव देशमुख, माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अमरसिंह पंडीत, एन साई शुगर कारखान्याचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार राहूल मोटे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की,  शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकात दोन पैसे मिळण्याची खात्री असल्यामुळे ऊसाकडे कल वाढला आहे. मागील वर्षी ऊसाचे क्षेत्र वाढले असुन या वर्षी सुद्धा ऊसाचे क्षेत्र दुप्पटीने वाढले आहे. त्यामुळे कारखान्याला गाळपा करीता ऊस मोठ्याप्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी वेळेत ऊस गाळपा करीता घेऊन जाणे गरजेचे आहे.  कुटुंब विस्तारीकरण वाढत आहे, त्यामुळे वाटणी मध्ये जमिनीचे तुकडे होत असुन ८२% टक्के शेतकरी हे दोन एक्करच्या आत आहेत. त्यामुळे आता युवकांनी या गोष्टीचा विचार करुन शेती पुरक व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच आता शेती आधुनिक पध्दतीने करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा शेती मध्ये नवीन प्रयोग करुन कमी पाण्यावर जास्त उत्पन्न मिळेल याचा विचार करुन नवीन पध्दतीने विकसित होत असलेली पिक पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे. यावेळी बी.बी.ठोंबरे लिखित साखरनामा पुस्तकाचे प्रकाशनही झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आवाड यांनी केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...