आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शुभकल्याण'कडून अंबाजोगाईतही 3 कोटींचा गंडा, ठेवीदारांची पोलिसांत धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- शुभकल्याण मल्टिस्टेटने परळीत आकर्षक व्याजदराचे अामिष दाखवून ७८ ठेवीदारांना ३ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतानाच अंबाजोगाईतही ३९ ठेवीदारांच्या तीन कोटी रुपयांच्या ठेवी  ‘शुभकल्याण मल्टिस्टेट’ ने घशात घातल्या. या प्रकरणी १२  संचालकांवर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परळीत शुभकल्याणच्या संचालकांत खळबळ उडाली आहे. आयुष्यभर काटकसरीने जमा केलेले ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.   


महाराष्ट्रात शुभकल्याण मल्टिस्टेटच्या १४० शाखा असून ठेवीदारांच्या तगाद्यामुळे सर्वच शाखांना सध्या टाळे लावण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच परळीत  शुभकल्याण मल्टिस्टेटच्या ७८ ठेवीदारांनी १४ महिन्यांसाठी ठेवलेल्या ठेवीची मुदत संपली तरी  पैसे परत न मिळाल्याने ठेवीदारांनी थेट  संभाजीनगर  ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी  चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांच्यासह ११ संचालकांवर ३ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.     परळी शाखेला कुलूप ठोकून चेअरमनसह सर्व संचालक मंडळ नॉट रिचेबल झाले आहते.    


परळीपाठोपाठ अंबाजोगाईतही  फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाईत २०१४ मध्ये  शुभकल्याणची शाखा  उघडण्यात आली. आकर्षक व्याजाच्या  योजना सांगून ठेवीदारांना  पॉम्प्लेट, होर्डिंग्जच्या माध्यमातून भुलवले गेले. शाखाधिकारी आणि कर्मचारीदेखील शहरात नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन गुंतवणुकीसाठी बोलावत होते. 


वाढीव व्याजदराच्या आमिषाने अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त कर्मचारी दिलीपसिंह शंकरसिंह 
ठाकूर  यांच्यासह ३८ जणांनी  जमा केलेली एकूण ३ कोटी २ लाख ६२ हजार २५० एवढी रक्कम  ठेवींच्या स्वरूपात गुंतवली. मात्र, ठेवीची मुदत उलटून गेल्यानंतर शुभकल्याणकडून रक्कम 
परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. नोव्हेंबर  २०१६ पासून या संस्थेच्या अंबाजोगाई  येथील शाखेतील व्यवहार पूर्णपणे बंद झाले. 

 

 यांच्यावर गुन्हा दाखल  
अंबाजोगाई शहर  ठाण्यात  शुभकल्याणचे अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, संचालक भास्कर  शिंदे,  अजय आपेट, नागिनीबाई  शिंदे, विजय   आपेट, कमलबाई  नखाते, शालिनी  आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा  आंधळे, आशा बिरादार, बाबूराव  सोनकांबळे, शशिकांत  औताडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

बातम्या आणखी आहेत...