आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थी नवोदयच्‍या परीक्षेला मुकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - सर्व परीक्षांबरोबरच नवोदयच्या परीक्षेचे नियोजन तसेच नोंदणी ही जिल्ह्यात पहिल्यांदा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून १० हजार ५७० विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. यातील ९ हजार ७९ विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर परीक्षा दिली. तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४९१ विद्यार्थी गैरहजर होते. तर यातील काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीच्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेच्या संधीपासून मुकावे लागले.


इयत्ता पाचव्या वर्गासाठी जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अर्ज मागवले होते. यावर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून १० हजार ५७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विद्यार्थ्यांनी सीएससी केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्रावरून अर्ज भरले हाेते. दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. 


शनिवारी झालेल्या परीक्षेसाठी १ हजार ४९१ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे नवोदय प्रशासनाच्या वतीने कळवले. जालना तालुक्यातील एम. एस. जैन मराठी व इंग्रजी माध्यम, सरस्वती भुवन, सीटीएमके गुजराती विद्यालय, कन्या प्रशाला या पाच केंद्रांवर तसेच  तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील १ हजार १३८ विद्यार्थ्यांनी शनिवारी परीक्षा दिली. यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांच्यासह नियुक्त अधिकारी, शिक्षकांनी नियोजन पाहिले.

बातम्या आणखी आहेत...