आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनापूरमध्‍ये एसटीचा भीषण अपघात, टायर फुटल्‍याने बस 500 मीटर फरफटत गेली; 25 प्रवासी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर (जालना) - बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राजवळ एसटी बसचे समारचे टायर फुटल्‍याने बस रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या लोखंडी गेटला धडकली. आज (शुक्रवारी) संध्‍याकाळी साडेसहाच्‍या दरम्‍यान हा अपघात झाला. यात बसमधील जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.


औरंगाबादहून चिखलीकडे जात असताना संध्‍याकाळी साडेसहाच्‍या सुमारास बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राजवळ बसचे (एम.एच. 40 एन. 9708) समोरचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बस दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेने जवळपास पाचशे फुट फरफटत गेली. त्यानंतर ती मोसंबी संशोधन केंद्राच्या लोखंडी गेटला धडकली. यावेळी चालक बसच्या बाहेर फेकला गेला तर बसमधील जवळपास २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.


या घटनेची माहिती मिळताच बदनापूर येथील नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना दवाखान्यात दाखल केले. दरम्यान पीएसआय चैनसींग गुसींगे, जमादार जॉन कसबे यांनीही काही जखमींना पोलिस वाहनातून रुगणालयात दाखल केले. या अपघातामुळे औरंगाबाद जालना महामार्गावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रस्‍त्‍यावर एक किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...