आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदन पत्रकार संघाला यंदाचा राज्‍यस्‍तरीय 'वसंतराव काणे' पुरस्‍कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन (जालना) - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा 'वसंतराव काणे' हा आदर्श तालुका पत्रकार संघाला दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा भोकरदन तालुका पत्रकार संघाला मिळाला आहे. पत्रकार संघटन व सामाजिक कार्याची दखल घेत औरंगाबाद विभागातून या पुरस्‍कारासाठी भोकरदन तालुका पत्रकार संघाची निवड करण्‍यात आली. याबद्दल भोकरदन तालुका पत्रकार संघाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  

 

दि.२४ रोजी सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्री श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष महेश देशपांडे यांना हा पुरस्कार पाटण (जिल्हा सातारा) येथे देण्‍यात आला. सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन त्‍यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश देशपांडे यांच्‍यासोबत पत्रकार संघाचे पदाधिकारी, जिल्हाकार्याध्यक्ष फकिरा देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजय सोनवणे, सुनील जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमात माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर, आमदार शंभूराज देसाई, संदीप देशपांडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमुख, सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, राज्यसरचिटणीस अनिल महाजन,  सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पटणे, पाटण तालुकाध्यक्ष शंकर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाला पुरस्कार मिळाल्याबद्दल भोकरदन नगर परिषद सभागृहात नगराध्यक्षा मंजुषाताई राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश देशपांडे यांचा सत्कार केला व सर्व पत्रकाराचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याधिकारी अमित सोंडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपनगराध्यक्ष इर्फानोद्दीन सिद्धिकी, गटनेते संतोष अन्नदाते, कदिर बापू राहुल ठाकूर, आशाताई माळी, गयाबाई रमेश जाधव, संध्याताई सुरेश शर्मा, हंमदू चाऊस, यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कार्यक्रमाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...