आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्मितीसाठी संमेलन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, असे मत ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांनी व्यक्त केले.


अंबाजोगाई येथे २४ डिसेंबर रोजी सुरु झालेल्या  ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप २५ डिसेंबर रोजी  संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मसापचे सचीव दादा गोरे, कोषाध्यक्ष भास्कर बडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, मसापचे सचिव दगडु लोमटे, उपशिक्षणाधिकारी (लातूर) शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी भावना राजभोर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात प्रा.  तिवारी यांनी अंबाजोगाई हे गाव विवेकसिंधूचे, दासोपंतांचे गाव आहे, असा गौरव करून या संमेलनाने अनेकांना गौरव दिला. सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन असते. हे संमेलन जेवढे सभागृहात झाले तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सभागृहाबाहेरही झाले असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे भाषण साहित्याचा उच्चांक असल्याचेही त्यांनी सांगितले.
 डॉ. अक्षयकुमार काळे यांनी या संमेलनाच्या आयोजनाचे कौतुक करून साहित्य निर्मितीच्या ऊर्जेला हे संमेलन प्रेरणा देणारे ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होत असते. लेखकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येत असते असे सांगितले.


मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांनी आपल्या भाषणात अ.भा. साहित्य संमेलनासाठी येणा-या रसिकांचा उच्चांक अंबाजोगाई येथील मराठवाडा साहित्य संमेलनाने मोडला आहे असे सांगून मसापचे साहित्य संमेलन आयोजन करणारे चार स्वागताध्यक्ष आमदार झाले असल्याचे सांगून  या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनाही आमदार होण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या संमेलनाच्या यशस्वी तेसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि संयोजन करणाऱ्या सर्वांचे आभार त्यांनी माणून यापुढील ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर येथे होईल अशी घोषणा त्यांनी केली.या संमेलनाचे प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी हे संमेलन अत्यंत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व सहका-यांचे आणि मान्यवरांचे आभार माणून हे संमेलन घेण्याची मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीने संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
शिक्षण आणि साहित्य यांचा अतूट संबंध असल्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि साहित्यिक यांचा जवळचा संबंध यावा म्हणून आणि या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांसमोर नतमस्तक होतो असे त्यांनी सांगितले.


हे संमेलन मराठवाडा साहित्य परिषदेचे अखिल भारतीय साहित्य संमेलन असल्याचा गौरव केला. या संमेलनाचा परिषदेला अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढून स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, कार्यवाह दगडु लोमटे, उपाध्यक्ष अमर हबीब, भगवान सोनावणे, भावना राजभोर, हिरालाल कराड, राजेश गायकवाड, व्यंकटेश गायकवाड, यांचा मसापच्या वतीने त्यांचा सत्कार केला.


समारोपाच्या या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे,  माजी जि. प. सदस्य संजय दौंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विलास सोनवणे, अंबासाखरचे व्हाइस चेअरमन हनुमंत मोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सदस्य राहुल सोनवणे, शिक्षणाधिकारी भागवत सोनावणे, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, उध्दवबापु आपेगांवकर, विद्दापीठ अधिसभेचे सदस्य गोविंद देशमुख, रामचंद्र तुरुके, अंबासाखरचे संचालक दाजीसाहेब लोमटे, श्रीरंग चौधरी, के. एस. आतकरे,  राहुल केंद्रे, सुधाकर शिनगारे, प्रा. पंडित सूर्यवंशी, प्रकाश देशमुख, संजीवनी तडेगांवकर, नरसिंग इंगळे, प्रा. डॉ. सतीश साळुंके यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात विश्वजित धाट यांनी गायलेल्या आणि स्व. प्राचार्या  शैला लोहिया यांनी लिहिलेल्या


“अक्षरांना अर्थ देऊन 
श्वास पेरीत चालणे, 
अमृता वेल्हाविते 
ही समर्पित जीवणे” 


या साहित्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सौ. ज्योती शिंदे यांनी केले आहेत तर आभार स्वागत समितीचे कार्यवाह दगडू लोमटे यांनी मानले.   या कार्यक्रमास मराठवाड्यातील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

 

विशेष सत्कार 
 या समारोप कार्यक्रमात   ९१ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, बडोदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.

 

 

प्रतिभा माने यांचा सत्कार 
स्वतःच्या पगारातील ७० हजार रुपये खर्चून शाळा डिजिटल करणाऱ्या प्रतिभा माने या शिक्षिकेचा पतीसह भरपेहराव देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...