आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळगावमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्‍पष्‍ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे  बुधवारी  सकाळी  घडली.  ऐश्वर्या दिगंबर येढे (  १५ वर्षे) रा.कोळगाव ता.गेवराई  असे आत्महत्या केलेल्या  विद्यार्थिनीचे नाव आहे.


मंगळवारी सकाळी मुलीने आत्महत्या केल्याची  घटना कळताच चकलांबा  ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन.एम.शेख,  पोलिस जमादार रमाकांत थोरात  यांनी घटनास्थळी भेट  देत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो मादळमोही येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. कोळगाव येथील स्मशानभूमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

ऐश्वर्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ऐश्वर्या ही विद्यार्थिनी कोळगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत  नववीच्या वर्गात शिकत होती तिने  नववीची परीक्षा दिली होती. ती अभ्यासातही हुशार होती, असे नातलगांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...