आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालकाने शिवीगाळ केल्याने महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर- सालगडी दांपत्याला शेतमालकाने शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर अपमान सहन न झाल्यामुळे सालगड्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे हा प्रकार घडला. चांगुबाई संजय पवार असे मृत महिलेचे नाव असून आरोपीविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संजय पवार व त्यांच्या पत्नी चांगुबाई हे वाकुळणी येथील नारायण काळवणे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत हाेते. त्यांनी काळवणे यांच्याकडून आगाऊ उचल म्हणून काही रक्कम घेतलेली होती. या पैशाच्या कारणावरून नारायण काळवणे यांनी महिला व तिच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण केली केली. हा अपमान सहन न झाल्याने चांगुबाई संजय पवार (वय ३२, रा. वाकुळणी ) यांनी २४ जून रोजी दुपारी विष प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 


शेतमालकावर गुन्हा...

याप्रकरणी पानाबाई काशीनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोलकर हे करीत आहेेत.

बातम्या आणखी आहेत...