आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब तहसीलदारासह पथकाला मारहाण; ३७ जणांविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहागड- अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारासह त्यांच्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शहागड येथील ३७ जणांविरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


वाळकेश्वर येथे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने दिवस-रात्र अवैध वाळू उपसा सुरू असून हायवा भरून देण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार अमित पुरी यांना मिळाली. तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार पुरी, मंडाळाधिकारी शिंदे, तलाठी कृष्णा मुजगुले आदी पथकातील कर्मचारी हे कारवाई करण्यासाठी वाळकेश्वरला गेले व गोदापात्रातील अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर, हायवा व अवैध वाळू भरत असताना पकडलेला जेसीबी यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, ३७ जणांच्या टोळक्याने महसूलच्या पथकावर हल्ला करत शिवीगाळ करून नायब तहसीलदार पुरी यांना मारहाण केली. तर घटनास्थळी असलेला जेसीबीही पळवून नेला. 


नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या फिर्यादीवरून जमालोद्दीन नुरमोहम्मद तांबोळी, मोहसीन करीम तांबोळी (रा. दोन्ही शहागड) व इतर अनोळखी ३५ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार सय्यद नासीर करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...