आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. भीमराव धोंडेंवर बलात्काराचा आरोप; पोलिसांनी नोंदवला जबाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांनी  सरबतातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पोलिस अधीक्षकांकडे  व नंतर थेट पोलिस महासंचालकांकडे महिलेने केलेल्या तक्रारीवरून सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आमदार धोंडे अडचणीत आले असून जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, रविवारी पोलिसांनी आमदार धोंडे यांचा या प्रकरणात जबाब नोंदवला.


सासू, सासरे व पती यांनी लग्नानंतर आपल्याला धोंडे यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे सांगत धोंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली आहे. या प्रकरणाने खळबळ उडालेली असून महिलेचा अर्ज चौकशीवर ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनीही या प्रकरणात बीडमध्ये एक दिवस तळ ठोकून चौकशी केली. त्यानंतर माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटाके या प्रकरणात चौकशी करत आहेत. रविवारी पोलिसांनी आमदार धोंडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली. तर दुसरीकडे साेमवारी औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी  व एएसपी भाग्यश्री नवटाके दिवसभर आष्टी  ठाण्यात तळ ठोकून होते.

 

धोंडेंकडून आरोपांचा इन्कार
दरम्यान, आमदार भीमराव धोंडे यांनी महिलेने केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. रविवारी आष्टीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपल्या विरोधातील हे षड््यंत्र असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...