आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरचौकात रुग्णवाहिका थांबवून ठिय्या; पतीसह दाेघांवर गुन्हा; पाटोदा येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा- सासरच्या छळास कंटाळून विष प्राशन केल्यानंतर मंगळवारी विवाहितेला गंभीर अवस्थेत बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  बुधवारी सकाळी तिचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला. जोपर्यंत  तिच्या पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचा पवित्रा माहरेच्या लोकांनी  घेतला.

 

पाटोदा येथील शिवाजी चौकातच बुधवारी रात्री अकरा वाजता  रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून माहेरच्या लाेकांनी  समोरच ठिय्या मांडला. हे पाहून पाटोदा  पोलिसांनी शेवटी पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा नोंदवला. त्यानंतरच नातेवाइकांनी अविवाहितेवर अंत्यसंस्कार केले.   
तालुक्यातील बांगरवाडी येथील विवाहिता वैशाली बिरुदेव काळे  (२१)  हिने मंगळवारी घरी सासरच्या छळास कंटाळून  विष प्राशन केले होते. खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर विवाहितेला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

उपचारादरम्यान बुधवारी विवाहितेचा मृत्यू झाला. यानंतर वैशालीचा  पती, सासरा,सासू यांनीच तिला विष पाजले आहे, त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी  माहेरच्या लाेकांनी केली. पोलिसांनी विवाहितेचे वडील कुंडलिक शंकर हजारे  (रा.नळेवडगाव, ता.भूम)  यांची तक्रार नोंदवून घेत वैशालीचा पती बिरुदेव मधुकर काळे, सासरा मधुकर काळे,सासू केसरबाई काळे  यांच्यावर गुन्हा नोंदवला असून तिघांनाही अटक केली.

बातम्या आणखी आहेत...