आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वैजापूर - एटीएम केंद्राभोवती चोख सुरक्षा व्यवस्था कार्यरत नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील बडोदा बँकेचे एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केला होता. एटीएम यंत्राची मजबूत बांधणी प्रणालीमुळे चोरट्यांचा लाखोंची रोकड लुटण्याचा डाव फसला.
शहरातील रोटेगावकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. याच ठिकाणी एका बाजूला ग्राहकांना झटपट आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीएम केंद्राची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, या केंद्रात सुरक्षा कर्मचारी नसल्याचे हेरून चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम केंद्रात प्रवेश करून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला.
मात्र यंत्र मजबूत असल्यामुळे चोरट्यांना रोकड रक्कम ठेवलेला कप्पा तोडता आला नाही. त्यामुळे चोरट्यांचा लाखोंची रोकड हातोहात पळवून नेण्याचा डाव उधळला. एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता चोरट्यांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फासला असल्याचे समोर आले आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
चोरट्यांचे लक्ष आता एटीएम लुटीवर....
चोरट्यांच्या टोळीने बँकेतून रोकड काढणाऱ्या ग्राहकांच्या बॅग पळवण्याचा हैदोस घातला होता. बँकेत ग्राहकांना वाटपासाठी जाणारी रोकड लुटण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसून पोलिसांनी दोन टोळ्यांची मुसक्या आवळण्याची कारवाई केली होती. त्यामुळे चोरट्यांनी शहरात सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकण्याचे धाडस करून पोलिसांना आव्हान दिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.