आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 % निकाल देणाऱ्या तीन शाळांचा बोर्डाला पडला विसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता औरंगाबाद बोर्डाने जाहीर केला आहे.  बीड जिल्हा यंदाही बोर्डात पाहिला आला.  जिल्ह्यातील एकूण  ६३५ शाळांपैकी ९४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ९४  शाळांनी निकालाची शंभरी  गाठली.   परंतु यापैकी तीन शाळांची नावेच बोर्डाच्या निकालपत्रात दिसत नाहीत. 

 
शुक्रवारी दहावी परीक्षेचा निकाल  बोर्डाने संकेतस्थळावर जाहीर केला.  यंदा दहावीच्या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातील  एकूण ६३५ शाळांतील  ९४  शाळांचा निकाल शंभर टक्के   लागला आहे.  यात  ९४ शाळांनी निकालाच्या टक्केवारीची  शंभरी गाठणाऱ्या तीन शाळांची नावेच औरंगाबाद बोर्डाच्या निकाल पत्रातून गायब झालेली आहेत.  जिल्ह्यातील उर्वरित  ५४१ शाळांपैकी  कमी निकाल लागलेल्या आणखी  पाच शाळांचीही नावे याच निकाल पत्रात नाहीत.    बोर्डाने जिल्ह्यातील एकूण आठ  शाळांची  नावे  का जाहीर केली नाहीत या बाबतही संभ्रम आहे. 

 

हा प्रिंटिंग दोष असावा
बीड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्याशी “दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता हा निकाल विभागीय मंडळाकडूनच जाहीर केला जातो. हा प्रिंटिंगचा दोष असू शकतो, असे उत्तर दिले. 

बातम्या आणखी आहेत...