आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह टॉवरजवळ सापडला, बीडमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी - वडवणी जवळील कान्होबा टेकडीच्या पायथ्याला असलेल्या मोबाइल टॉवरजवळ  केसापुरी परभणी येथील गतिमंद  तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत मंगळवारी सकाळी  आठ वाजता आढळून आला. टेकडीपासून केवळ शंभर मीटरवर अंतरावर  टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पोलिसांना एक चाकूही सापडला.  मात्र तरुणीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जखम दिसून आली नाही.  


वडवणी जवळील कान्होबा टेकडीच्या पायथ्याला एका  मोबाइल टॉवर जवळ मंगळवारी सकाळी ८ वाजता टेकडीकडे  जाणाऱ्या  लोकांना कोमल परमेश्वर तांगडे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी याची माहिती पाेलिसांना देताच  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  कोमल  केसापुरी परभणी येथे नववीच्या वर्गात  शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आईवडील,  दोन भाऊ, एक बहीण  असा परिवार आहे. वडील परमेश्वर तांगडे हे ऊसतोड कामगार असून दहा दिवसांपूर्वीच ते साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने गावी आले होते. कोमल  सकाळीच गायब झाल्यानंतर तिचा  कुटुंबातील लोकांनी शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी  तिचा मृतदेह आढळला.  

 

इतके लांब जाणार नाही

माझी मुलगी मतिमंद असल्याने ती सतत गायब व्हायची.  गावातील मंदिर किंवा कोणाच्याही घरी सापडायची.  मात्र सोमवारी ती  सापडली नाही. आज सकाळी ती टॉवरमध्ये मृतावस्थेत आढळून आली. मतिमंद असली तरी ती एवढ्या लांब येणारच नाही.
- परमेश्वर तांगडे, कोमलचे वडील

 

व्हिसेरा राखून ठेवला

कोमलच्या शवविच्छेदनानंतरच शरीरातील व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. कोमलच्या हाताचे, पायाचे व छातीची हाडे मोडली आहेत. मात्र तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे  डॉ.चिंचोले यांनी सांगितले. व्हिसेरा राखीव ठेवल्यामुळे मृत्यूचे खरे कारण नंतरच कळेल.

 

घातपाताचाही  संशय  
कोमलचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत टॉवरला विद्युत पुरवठा करणाऱ्या जनरेटरजवळ  आढळून आला.  पोलिसांना घातपाताचा संशय आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बीड  जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कान्होबा टेकडीपासून केवळ १०० मीटरवर बीड-परळी राज्य मार्ग अाहे.

बातम्या आणखी आहेत...