आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात बुडालेल्या मुलीचा 3 दिवसांनंतर मृतदेह सापडला; पालममधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- पालम शहरातील फरकंडा रोड लगत असलेल्या तलावात  कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींपैकी एक बहीण पाण्यात पडली म्हणून त्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या सुरय्या मेहबूब पठाण (१२) हिचा पाण्यात बुडाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी म्हणजे मंगळवारी (दि.२३)  मृतदेह सापडला. तब्बल तीन दिवसानंतर आपत्कालीन यंत्रणेच्या सहकार्याने मृत सुरैय्या हिचा मृतदेह काढण्यात यश आले. रविवारी (दि.२१) सकाळी आठच्या सुमारास ही घडली होती.  या घटनेतील सानिया उर्फ बुशरा पठाण (१०)  हिला  स्थानिक नागरिकांनी तलावातून वर काढले होते. तिला पालम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले व तेथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे गुरू गोविंद सिंग शासकीय  रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. 


शहरातील पठाण गल्लीजवळ फरकंडा रोड लगत निजामकालीन तलाव आहे. या तलावावर कपडे धुण्यासाठी शहरातील सुरय्या मेहबूब खाँ पठाण व छोटी बहीण सानिया उर्फ बुशरा मेहबूब खाँ पठाण  या बहिणी गेल्या होत्या. कपडे धुत असताना छोटी बहीण बुशरा पठाण हिचा अचानक तोल गेल्याने ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी जवळच उभी असलेली सुरैय्या मेहबूब पठाण  हिने तलावात उडी घेतली. ती  छोट्या बहिणीला वाचवण्यात यशस्वी झाली. पण ती स्वत: बुडाली. नागरिकांनी सानिया उर्फ बुशरा पठाण  हिला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेची पालम पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

 

नांदेड व परभणी येथील पथकाला पाचारण
सदरील घटना घडून तीन दिवस उलटले. गावकऱ्यांना सुरैय्याचा मृतदेह सापडला नाही.  स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम करूनही यश आले नाही. परिणामी तहसीलदार श्रीरंग कदम यांनी नांदेड व परभणी येथील महापालिकेच्या आपत्कालीन पथकाशी संपर्क करून पाचारण केले. मंगळवारी (ता.२३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पथकाने तलावात शोध घेऊन मृत सुरैय्या मेहबूब पठाण  हिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

 

पथकात यांचा समावेश
 पालमचे तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळ अधिकारी विजय बोधले,  नांदेड येथील पथकातील शेख रहीम पाशा, डी.के. कदम, व्ही.के.ठाकूर, कैलास पावडे, कालिदास खिल्लारे, शेख हबीब, तर परभणी पथकात अविनाश समुद्रे, पी.बी.कानोडे, एस.के.मौला सहभागी झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...