आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीस पळवले; बलात्कार, अॅट्रॉसिटीचाही गुन्हा नोंद; मुख्य आरोपीसह दोघंना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- येथील आनंदनगर भागातील अनुसूचित जातीच्या १७ वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी दाखल केलेल्या प्रकरणात मुख्य आरोपीसह एका बाल आरोपीला अटक करण्यात आली. प्रकरणात आरोपींची संख्या दोनवरून तीन झाली असून बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचे कलमही वाढवण्यात आले आहे. हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा पीडितेच्या पालकांनी आरोप केल्याने ग्रामीण पोलिस ठाणे भागात शनिवारी रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता.   


आनंदनगर भागातील सदर युवती महाविद्यालयात ये-जा करीत असताना रिसाला बाजार भागातील शेख अासिफ या ऑटोचालकाने तिला ८ डिसेंबर रोजी त्याच्या मित्राच्या मदतीने पळवून नेले. याबाबत युवतीच्या नातेवाइकांनी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिल्यावर पीएसआय सुप्रिया केंद्रे आणि एएसआय नागोराव मुंढे यांनी तपास करून २४ तासांतच मुख्य आरोपी व त्याचा १७ वर्षीय अल्पवयीन साथीदार यांना पीडित मुलीसह शहराजवळील देवळा भागातून शनिवारी रात्री १ च्या सुमारास अटक केली.  प्रकरणातील तिसरा आरोपीसुद्धा निष्पन्न झाला असून शेख जुनैद (कमलानगर, हिंगोली) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मागावरही पोलिस असून अटकेतील आरोपींकडून त्याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती घेतली जात आहे. कथित लव्ह जिहादचे प्रकरण गेल्या तीन महिन्यांत उघड होण्याची आणि तसा आरोप होण्याची ही तीन महिन्यांतील दुसरी घटना आहे. 

 

लव्ह जिहादचा आरोप
या प्रकरणात सुरुवातीला केवळ भादंविच्या ३६३, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कारासह पॉस्को कायद्यातील कलमे वाढवण्यात आली. पीडितेच्या पालकांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करून आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरल्याने  पोलिसांनी कोणतीही कसर न सोडता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवले.

बातम्या आणखी आहेत...