आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- व्याजाच्या पैशांवरून भुसा व्यापाऱ्याचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अजित इथापे, हनुमंत कवचाळे व आमीर सय्यद या तीन जणांना गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खून प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने २२ साक्षीदार तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे महत्त्वाचे ठरल्याने न्या. बी. जी. वाघ यांनी तीनही आरोपींना शिक्षा सुनावली आहे.
पिंपरखेड (ता. आष्टी) येथील भुसा मालाचे व्यापारी बाळासाहेब चव्हाण हे खासगी सावकारी करत होते. त्यांनी अजित इथापे(रा. चिंचोली) व गजानन चव्हाण यांना व्याजाने पैसे दिले होते. पैशांसाठी चव्हाण तगादा लावत असल्याने अजित व गजानन यांनी त्यांना संपवण्याचा कट रचला. अजितने हनुमंत कवचाळे (रा. शिरापूर☺) याला त्याच्या चारचाकीसह खुनाच्या कटात सहभागी करून घेतले. १० जानेवारी २०१६ रोजी इथापे, कवचाळे यांनी चव्हाण यांना जेवणासाठी अजितच्या रानमळा फाट्यावरील शेतात बाेलावून घेतले. भुसा खरेदीच्या निमित्ताने हनुमंतने बाळासाहेब यांना दुचाकीवरून डोंबाळवाडीला (ता. कर्जत) नेले. अजित आणि आमीर सय्यद हे हनुमंतच्या चारचाकीतून कर्जतमध्ये गेले.
दुचाकी अपघाताचा केला बनाव
ज्या दुचाकीवरून हनुमंतने बाळासाहेब चव्हाण यांना डोंबाळवाडीत नेले होते. ती दुचाकी बाळासाहेबांची होती. बाळासाहेबांचा खून केल्यानंतर कडा ते मिरजगाव रस्त्यावर त्यांचा मृ़तदेह टाकून जीपने त्यांच्या डोक्याला पुन्हा धडक दिली. दुचाकी रस्त्याला टाकून बाळासाहेबाचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करण्यात आला हाेता.
सिटबेल्टने
गळाही आवळला व्यापारी चव्हाण यांचा मृत्यू झाला म्हणून रस्त्यावर सोडलेले बाळासाहेब जखमी अवस्थेत रस्त्याने पायी जाताना त्यांना दिसले. दगडाने मारूनही ते जिवंत राहिल्याने हनुमंत कवचाळे आणि आमीर सय्यद यांनी त्याला जीपने जोराची धडक दिली. मृत्यू झाल्याची खात्री व्हावी यासाठी त्यांना जीपमध्ये टाकून सिटबेल्टने गळाही आवळण्यात आला.
दारू खरेदी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज
या प्रकरणात घटनाक्रमाच्या अनुषंगाने २२ साक्षीदार तपासण्यात आले. दारू दुकानातून दारू खरेदी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या अंगावरील रक्ताचे डाग, मृताच्या डोक्यावरील केस, गुन्ह्यात वापरलेल्या जीपमधील रक्ताचे डाग हे आरोपींना शिक्षेपर्यंत पोहाेचवण्यात महत्त्वाचे ठरले.
दगडाने मारले, मृत्यू झाला म्हणून सोडले
कर्जतमध्ये सर्वांनी दारू घेतली. यानंतर तिघेही देमनवाडी शिवारातून जात असताना हनुमंत कवचाळे व आमीर यांनी बाळासाहेब याला दगडाने बेदम मारहाण केली. यात बाळासाहेब रस्त्यावर मृतावस्थेत पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे समजून दोघेही परत चारचाकी गाडी आणण्यासाठी गेले. पुन्हा त्या रस्त्यावरून येताना बाळासाहेब जागेवर नसल्याचे दिसल्याने तिघेही भांबावले आणि त्याचा शोध सुरू केला.
अचूक तपास, ठोस पुरावे
या प्रकरणात बाळासाहेब यांचे भाऊ सतीश चव्हाण यांच्या तक्रारीवरून कवचाळे, इथापे, सय्यद, चव्हाण या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. आष्टीचे तत्कालीन पो.नि. दिनेश आहेर यांनी तपास करून आरोपींविरोधात गोळा केलेल्या ठोस पुराव्याने ते शिक्षेपर्यंत पोहाेचू शकले.
दंड न भरल्यास कारावास
कवचाळे, इथापे व सय्यद यांना जन्मठेपेची शिक्षा व हनुमंत व अजित यांना दहा हजारांचा तर आमीर सय्यदला १ हजार दंड व दंड न भरल्यास ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली.
- अजय राख, जिल्हा सरकारी वकील
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.