आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू जुंदालने निवडणुकीची माहिती मागताच राष्ट्रीय तपास यंत्रणांचे लक्ष पुन्हा बीडकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड -  २६/११ च्या मुंंबई हल्ला प्रकरण व वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात अटक असलेला अतिरेकी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याने माहिती अधिकारात बीड नगरपालिकेच्या निवडणुकीची माहिती मागितल्याने खळबळ उडाली. राष्ट्रीय तपास यंत्रणांचे लक्ष पुन्हा बीडकडे वेधले गेले असून बीड पालिकेच्या निवडणुकीची माहिती जबीने का मागवली असावी, याचा आता राष्ट्रीय तपास संस्थांकडून शोध घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.   


वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात फरार झालेला जबिउद्दीन अन्सारीनंतर २६/११ च्या मुंबई हल्ल्यात अतिरेक्यांना पाकिस्तानातून सूचना देत असल्याचेही निष्पन्न झाले होते. यासाठी त्याला शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगातून जबीने  बीड शहरातील जुनाबाजार, हत्तीखाना, हाफिज गल्ली, कागदीवेस या भागात १९८० पासून आतापर्यंतच्या निवडणुकांत विजयी व पराभूत उमेदवारांची माहिती बीड नगरपालिकेला मागितली होती.

 

बीड पालिकेने तांत्रिक कारण देत माहिती देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर जबीने प्रथम अपील केले होते. यानंतर माहिती आयुक्तांनी देशहितास्तव अशी माहिती दहशतवाद्यांना देता येत नसल्याने हे अपील फेटाळत माहिती देण्यास इन्कार केला होता. दरम्यान, बीड पालिकेतील १९८० पासूनच्या नगरसेवकांची माहिती जबीने का मागितली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गरज पडल्यास बीडमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांचे प्रतिनिधी येऊन ही माहिती घेत यातून काय करता येणे शक्य आहे, कागदीवेस, जुनाबाजार, हत्तीखाना, हाफिज गल्ली या भागाचीही ते माहिती घेऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...