आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बालरक्षक' मुळे रोखता आली शाळाबाह्य मुलांची संख्या! जालाना जिल्‍ह्यातील उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- ऊसतोड कामगारांप्रमाणे ऑक्टोबर महिन्यापासून  कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाल रक्षक  संकल्पना जालना जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली  जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील शेकडो मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली  असून जिल्हाभरात १ हजार १५० बाल रक्षक काम करत आहेत.

  
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर देण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई २००९ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यशासनाकडून  पाठपुरावा सुरू आहे. या अंतर्गत जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बाल रक्षक संकल्पना पुढे आली.   बालकांच्या हक्क व अधिकारासाठी काम करणाऱ्या ए.व्ही.फाफाउंडेशनने याला चाइल्ड डिफेंडर शब्द वापरला. त्यावरून बाल रक्षकांची संकल्पना पुढे आली. या पूर्वी केवळ सामाजिक संस्थाच शाळाबाह्य मुलांसाठी काम करत होत्या. मात्र, शिक्षक करत असलेले काम दिसत नव्हते.आता शिक्षकांचे कामही बाल रक्षक चळवळीतून पुढे येत आहे. मुलांविषयी अनेक कायदे आहेत.  त्यातून अनेकदा संघर्ष निर्माण होतात. परंतु आता मुलांचे प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी शिक्षण विभागातील प्रत्येक व्यक्ती बाल रक्षक शिक्षकांसोबत काम करत आहेत.    


प्रगत शैक्षणिकमधून बाल रक्षकाची संकल्पना

शाळाबाह्य मुलांच्या अनेक समस्या  आहेत. त्यामागील  कारणेही वेगळी आहेत. त्यांना शाळेत नियमित दाखल करण्यासाठी मदतीची गरज आहे.

 

१७ विद्यार्थ्यांना शाळेत दाखला
बदनापूर येथे स्थलांतर होऊन आलेल्या पालातील विद्यार्थ्यांची विद्या प्राधिकरण पुणे येथील समता विभागाला माहिती मिळाली. याची दखल घेत विभागाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाने, गटशिक्षणाधिकारी कडेलवार विस्तार अधिकारी नारायण कुमावत यांनी तत्काळ   पालकांची भेट घेऊन १७ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेतले  तर एका मुलीला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात  प्रवेश दिला.  

बातम्या आणखी आहेत...