आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकाचा खून करणा-या पाणीपुरी गाडा चालकास जन्मठेप;परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहरातील साईबाबा नगरात पाणी पुरी देण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत ग्राहकाचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी पाणीपुरी गाडा चालक बालाजी रेवणवार यास मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती उर्मिला एस. जोशी फालके यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी (दि.१०) ठोठावली. 


शहरातील साईबाबा नगरात २१ मे २०१६ रोजी दुपारी चारच्या  सुमारास पाणी पुरीचा व्यवसाय करणारा बालाजी नरहरी रेवणवार (वय ४५) व वांगी रोडवरील शेख युनूस कुरेशी (वय ३६) यांच्यामध्ये पाणी पुरी देण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर बालाजी रेवणवार याने पाणी पुरीच्या गाड्यातील कांदा कापण्याचा चाकू हातात घेवून शेख युनूस कुरेशी याच्यावर दोन वार करून गंभीर जखमी केले. यात शेख युनूस कुरेशी याच मृत्यू झाला होता. याप्रकरणी शेख हबीब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.के. देशमुख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य जिल्हा न्यायाधीश उर्मिला एस.जोशी -फालके यांनी या प्रकरणातील साक्ष पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बालाजी रेवणवार यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद गाजरे व फिर्यादीच्या वतीने अॅड. अफजल बेग यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. मो.शाहीद, अॅड. सय्यद जुनेद यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...