आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा येथे आज जिजाऊ जन्मोत्सव; लाखोंचा जनसागर उसळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी  सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर लाखोंचा जनसागर उसळणार आहे. जन्माेत्सवाच्या मुख्य सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भाेसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भाेसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


 या साेहळ्याच्या निमित्ताने मराठा विधिभूषण पुरस्कार ॲड. मिलिंद पवार यांना, मराठा शिवशाहीर पुरस्कार विजय तनपुरे, मराठा उद्योगभूषण पुरस्कार संजय वायाळ तसेच मराठा सेवा संघाचा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना प्रदान केला जाणार आहे. 
शुक्रवारी पहाटे सूर्योदयसमयी राजवाड्यात जिजाऊंचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर सात वाजता राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत वारकरी दिंडी व पालखी  सोहळा निघेल. सकाळी ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण हाेईल. दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवधर्मपीठावर मुख्य सोहळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...