आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंब: न्यायाधीशांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब - येथील न्यायालयाच्या आवारातच न्यायाधीशांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली.  याप्रकरणी माहिती मिळताच कळंब पोलिसांनी  कारचालकाला गजाआड केले आहे.  


कळंब येथील दिवाणी न्यायाधीश अनंत मुंडे हे  उन्हाळ्याची सुटी संपवून रविवारी (दि.२०) रात्री ८ वाजता  कारमधून कळंब न्यायालय परिसरातील निवासस्थानाकडे जात असताना तेथील पहारेकरी घुगे तेथे थांबले होते. याचवेळी अचानक एक इंडिका कार वेगात न्यायालयाच्या आवारात दाखल झाली.  घुगे यांनी कारचालकाला “”तुम्हाला काय पाहिजे’ असे विचारत कारमध्ये विधिज्ञ असतील असे समजून चर्चा करत होते.

 

परंतु, कारमधील चालक आकाश चोंदे पहारेकऱ्याशी मोठ्याने बोलत असल्याने न्यायाधीश मुंडे त्यांच्या कारमधून उतरून तेथे आले. न्या. मुंडे यांनी तुम्ही कोण आहात, येथे कशाला आलात, अशी  विचारणा केली. यामुळे राग आलेल्या कारचालक आकाश चोंदेने त्याची कार थेट न्या. मुंडे यांच्या अंगावर घातली. यावेळी प्रसंगावधान राखत न्या. मुंडे हे बाजूला सरकल्याने ते बचावले. घुगे यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला परंतु, कार वेगात निघून गेली. यावेळी घुगे यांनी कारचा नंबर (एमएच ०३ एडब्ल्यू २८२१) टिपून घेतला.    न्या. मुंडे यांच्या फिर्यादीवरून चोंदेवर गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...