आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानीच्या मंदिरात भाविकांचे पाण्यावाचून हाल, जारवर भागवावी लागते तहान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - उन्हाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेले आहे. येथील तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांचे मंगळवारी पाण्यावाचून हाल झाले. गोमुख तीर्थासह मंदिरातील सर्वच नळ कोरडे पडले होते. त्यामुळे भाविकांना जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागली. 


उन्हाळ्याचा सुट्या तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, प्रचंड उकाड्यामुळे तहानेने व्याकूळ भाविकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दुपारी दोन नंतर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले. 

 

दरम्यान मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी कल्लोळ तीर्थाच्या बाजूला, होमकुंडासमोर तसेच दत्त मंदिराच्या बाजूला विविध ठिकाणी पाण्याचे जार ठेवण्यात आले होते.  मंगळवारी दिवसभर भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. धर्म दर्शनासाठी दोन तासांचा अवधी लागत होता तर मुख दर्शनासाठी एक तास वेळ लागत होता. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री साडेदहाच्या सुमारास छबिना मिरवणूक काढण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...