आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर मैत्री झाली अन् दोघी पळून गेल्या, बंगळूरूत बंद खोलीत दोन तरूणंसोबत आढळल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/केज- केज तालुक्यातील एकाच गावातून एक महिला बेपत्ता तर तरूणी पळवून नेल्याची तक्रार दीड महिन्यापूर्वी पोलिसात दाखल झाली होती. मोबाईलच्या लोकेशनवरून त्या दोघी बेंगलोरला असल्याचे उघड झाल्यावर केज पोलिसांनी बेंगलोर पोलिसांच्या मदतीने त्यांना एका खोलीतून ताब्यात घेऊन सोमवारी पोलिस ठाण्यात हजर केले. त्या दोघी फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून निघून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महिला २३ वर्षाची तर मुलगी ही १७ वर्षाची आहे. पोलिसांनी या छाप्यात बंगाल व बिहार येथील दोन तरूणांनाही पकडले आहे. 


फेसबुकवर झाली दोघींची मैत्री 
फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून त्या दोघी निघून गेल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघी गावातून केजला आल्या. केजहून धारुर, अंबाजोगाई करीत अंबाजोगाईहुन पुण्याला गेल्या. पुण्यातून रेल्वेने बेंगलोरला गेल्या. तेथून अॅटोने किरायाच्या खोलीपर्यंत पोहचल्या. बेंगलोर येथील दोन तरूणांच्या मदतीनेच त्या केजहुन बेंगलोरला पोहचल्याचा संशय पोलिसांना आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, दवाखान्यातून येते, म्हणून घरातून बाहेर पडल्या त्या घरी परतल्याच नाहीत....

बातम्या आणखी आहेत...