आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन ठार, दोन जखमी; आष्टा फाट्यावर घडला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- पुण्याहून भूमकडे निघालेल्या कारची जामखेडहून आष्टीकडे येणाऱ्या मालवाहू कंटेनरशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे साडेतीन वाजता नगर-जामखेड महामार्गावर आष्टा फाटा येथे घडला. जखमींवर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला. 


पुणे येथून भूमकडे निघालेल्या कारमध्ये (एमएच २५ ए ३३१०) नसरीन मुनव्वर पठाण, मुनव्वर अब्बास अली पठाण, आर्शिया मुनव्वर पठाण व करिष्मा मुनव्वर पठाण हे बसलेले होते. ही कार आष्टी तालुक्यातील आष्टा (ह.ना.) फाट्यानजीक आली तेव्हा जामखेडहून आष्टीकडे येणारा मालवाहू कंटेनर एमएच ४३ यू ७९१९ समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमद इक्बाल पठाण (२७) व मुनव्वर पठाण (४५) हे जागीच ठार झाले. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात तौफिक पठाण यांच्या तक्रारीवरून वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...