आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - तालुक्यातील अकोला येथे विहीरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. परमेश्वर हनुमंत आगळे (१८) व ज्ञानेशवर महादेव आगळे (१८)अशी मृतांची  नावे आहेत.


 या दोघांनीही यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती. तर परमेश्वर याची ६ मे रोजी नीटची परीक्षा होती.  पोहायला येत नसतानाही  या दोघांनी विहिरीत पोहण्याचे केलेले धाडस अंगलट आले आणि जिवाला मुकावे लागले. दहा दिवसांपूर्वीच परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथील  कॅनॉलमध्ये पोहायला गेलेल्या  शिक्षकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अकोला येथे ही घटना घडली आहे. 


 परमेश्वरचे वडील हनुमंत आगळे हे घटनास्थळीच होते. त्यांनी मुलांच्या ओरडण्याचा आवाज येताच विहिरीत उडी घेतली. त्यांनी दोघांनाही बाहेर काढले. घटनेची  माहिती  मिळताच सरपंच श्रीनिवास आगळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोघांनाही उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हलवले. परंतु त्या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी  घटनेने अकोला गावात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...