आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीच्या २ वारकरी महिलांचा पुण्यातील अपघातात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी/पुणे- आषाढी वारीसाठी गेलेल्या परळी तालुक्यातील जलालपूर गावातील दोन महिलांचा पुण्यातील भोसरी जवळील (मोशी) येथे अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. नात्याने दोघी नणंद-भावजय आहेत. जनाबाई साबळे (६०) व सुमनबाई इंगोले (६०) या दोघी पंधरा दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथून वारीसाठी आळंदीला गेल्या होत्या. त्यांच्या पालखीचा मुक्काम मंगळवारी रात्री भोसरी येथे होता. बुधवारी पहाटे प्रात:र्विधीस जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांना एका ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पिंपरीतील रुग्णालयात हलविण्यात अाले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अंबाजोगाईहून निघालेली दिंडी आळंदीतून निघणाऱ्या वारीत सहभागी होत असते. पुणे-चाकण हायवे लगत मुळशीजवळ वस्तीवर मंगळवारी ही दिंडी मुक्कामी होती. 


पंधरा वर्षांपासून वारीत सहभाग 
अंबाजोगाईहून भुजंग बाबा कसपटे यांच्या पायी दिंडीचे १५ जूनला प्रस्थान झाले होते. या दिंडीत एकूण २२ वारकरी सहभागी झाले होते. त्यात परळीतील ७ जण होते. गेल्या १५ वर्षांपासून या दोघी दिंडीत सहभागी होत होत्या.