आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 6 चिंताजनक; उकळलेला रस अंगावर पडल्याने दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात उसाच्या उष्ण रसाची टाकी फुटून १२ कामगार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेत शनिवारी उपचारादरम्यान ५ कामगारांचा मृत्यू झाला. लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी पहाटे पंढरीनाथ आदनाक (५०), सुभाष गोपीनाथ कराड (४५) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ११च्या सुमारास गौतम घुमरे (गाढेपिंपळगाव) यांचीही प्राणज्योत मालवली. सायंकाळी पाचच्या दरम्यान सुनील भंडारे यांचा तर रात्री सुमीत भंडारी देशमुख (टाकळी) यांचाही मृत्यू झाला.   


काय होती घटना

वैद्यनाथ कारखान्यात उसाच्या रसाच्या टाकीत अचानक वाफेचा दाब वाढल्याने इव्हॅपोरेटरच्या खालच्या बाजूचा जोड दुभंगून आतील १२० डिग्री सेल्सियसपेक्षाही अधिक तप्त उकळता रस आणि वाफेचे मिश्रण वेगाने बाहेर फेकले गेले. या अपघातात १२ कर्मचारी गंभीर भाजले होते. अंबाजोगाई व लातूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
मुंडे भगिनींची भेट : शनिवारी सकाळी ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे यांनी लातूर येथे जाऊन जखमींची व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे रविवारी कारखान्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

 

मृतांच्या वारसांना ६ लाख मदत  
मृताच्या वारसांना प्रत्येकी ३ लाख रुपये, मुख्यमंत्री मदतनिधीतून २ लाख, मुंडे कुटुंबातर्फे वैयक्तिक १ लाख व कुटुंबातील एकाला कारखान्यात नोकरी मिळेल. जखमींना उपचाराचा खर्च व मुंडे कुटुंबातर्फे वैयक्तिक १ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ५० हजार, कारखान्याकडून २५ हजारांची मदत मिळणार आहे.

 

घटनेनंतर कारखाना बंद...

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. दरम्यान, घटनेनंतर कारखाना बंद करण्यात आला. दुपारी दुसऱ्या टाकीत उसाचा रस टाकण्याची पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात आली.

 

वेल्डिंगचे काम सुरु असताना टाकीला पडले मोठे ‍भगदाड

शुक्रवारी दुपारी टाकीची वेल्डिंगचे सुरू होते. अचानक टाकीला मोठे भगदाड पडले. टाकीत 120 डिग्री सेल्सिअस तापमानावर उसाचा रस उकळत‍ होता. रस उसळून कारखान्यावरील तंत्रज्ज्ञ कामगार अशा 11 जणांच्या अंगावर पडला. यात सुभाष कराड (लिंबोटा), सुमीत भंडारी (देशमुख टाकळी) हे 100 तर रामभाऊ नागरगोजे (मांडेखेल), हे 95 टक्के भाजले. तसेच चंद्रकांत मिसाळ (नाथ्रा), सुनिल भंडारे (देशमुख टाकळी), संगापुडे हनुमंत अभियंते धनाजी देशमुख (परळी) हेही जखमी झाले आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...