आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय विवाहित तरुणी गावकऱ्यांच्या सहमतीने प्रियकरासोबत पुन्हा रीतसर विवाहबंधात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन - भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील आशा हरिश्चंद्र बोराडे वय 21 वर्ष  ही विवाहित तरुणी विवाहानंतर  सर्जेराव सुरेश दौड रा पिंपळदरी  ता सिल्लोड या युवकाच्या प्रेमात पडली दोन दिवसा पासून घरातून बेपत्ता असणाऱ्या तरुणीचा शोध घेण्यासाठी तिच्या आईने भोकरदन पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती बेपत्ता तरुणी दिनांक- ८ रोजी आपल्या प्रियकरासोबत स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली.

 

भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक  दशरथ चौधरी व पोलिस उप निरीक्षक  वैशाली पवार यांनी दोघांचे ही जबाब नोंदवून  घेतले.  त्यांनी दिलेल्या जबाबत आम्ही दोघे स्वखुशीने  गेलो होतो आमचे एकमेकांवर प्रेम आहे आम्ही विवाह देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले असता वाकडी गावचे पोलिस पाटील  माधव शिरसाठ दिलीप बर्डे ईश्वर बोराडे, यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे प्रेमप्रकरण स्वीकारून  भोकरदन येथील मारोती मंदिरात दि 8 शुक्रवारी रात्री ९:३० वाजता त्या दोघांचा रीतसर विवाह लावून दिला  

 

 

बातम्या आणखी आहेत...