आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिलांचे भांडण सोडवणे पडले महागात; एकीने चावा घेतल्याने महिलेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- दोन महिलांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलेला भांडणाऱ्या एका महिलेने चावा घेतला. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. मृत महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे व्हिसेरा तपासणीनंतर उघड होणार असल्याचे सांगण्यात आले. 


विवेकानंद चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर-बाभळगाव रस्त्यावर म्हाडा वसाहत आहे. तेथे गुरुवारी सायंकाळी विमल धाकडे व सविता कोल्हे या दोन महिलांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. नंतर हाणामारीही झाली. भांडण विकोपास जाऊ नये अशी सामंजस्याची भूमिका घेऊन शेजारच्याच पद्मिनबाई कांबळे (५५) दोघींचे भांडण सोडवण्यास गेल्या. मात्र भांडणाऱ्या दोन्ही महिला बेभान होऊन हाणामारी करीत होत्या. त्यातच भांडण करीत असलेल्या विमल धाकडे या महिलेने पद्मिनबाई कांबळे यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. तो इतका तीव्र होता की कांबळे यांच्या हातातून रक्तप्रवाह सुरू झाला. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र रात्रभर उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी पद्मिनबाई कांबळे यांचा मृत्यू झाला. 


पोलिस संभ्रमात 
या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवायचा की खुनाचा गुन्हा नोंदवायचा यावरून पोलिसही संभ्रमात सापडले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. वैद्यकीय अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मानस पोलिसांनी बोलून दाखवला. 

बातम्या आणखी आहेत...