आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, 5 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -  येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पीक विमा योजनेच्या संदर्भात गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांत गुरुवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास जुंपली. शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत व मोडतोडीत झाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा  तक्रार दिली. 

  
या प्रकारांत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, मालेवाडी येथील भानुदास शिंदे, शेळगाव येथील विश्वंभर गोरले, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशराव दुधाटे गोळेगावकर, माउली कदम या पाच जणांना जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.    

बातम्या आणखी आहेत...