आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणाची गळफासाने आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील कुंबेफळ येथे शुक्रवारी सकाळी घडली. किरण गोविंदराव हुलगे (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 


कुंबेफळ येथील किरण गोविंदराव हुलगे हा तरुण सकाळी हॉटेलवर दूध घालून शेतात गेला होता. घर शेतात असल्याने वडील व आजोबा शेतात पेरणीसाठी लागणारे खत-बियाणे आणण्यासाठी गावात गेले होते. शेतातील घरात कुणीच नसल्याचे पाहून किरण हुलगे याने गोठ्यासमोरील शेतातील चिंचेच्या झाडाला सकाळी आठ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील, आजोबा खते- बियाणे घेऊन घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्वाराती रुग्णालयात तरुणाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 


कारण स्पष्ट नाही 
किरण हुलगे या तरुणाचे दीड महिन्यापूर्वीच मामाच्या मुलीशी विवाह झाला होता. त्याची पत्नी चार दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती. शुक्रवारी पत्नी सासरी येणार होती. ती येण्यापूर्वीच ही घटना घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. 

बातम्या आणखी आहेत...