आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Latur- विहिरीत तरंगत होता शीर नसलेला युवकाचा मृतदेह, खिशात आढळले आधार कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - निलंग्यातील ननंद या गावात एका विहिरीत शीर नसलेला युवकाचा मृतदेह सापडला आहे. मृताच्या अंगात असलेल्या पॅंटमध्ये एक आधार कार्ड सापडले असून त्यावर असलेल्या नाव आणि पत्त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांना मृतदेह पाच दिवसांपासून विहिरीत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

 

मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाच्या पॅंटमध्ये सापडलेल्या आधारकार्डवर विवेकानंद धुमाळे (23 वर्ष, वाढवना (बु), ता उदगीर) असा पत्ता आहे. ननंद गावातील ग्रामस्थांना हा मृतदेह शिवारातील विहिरीत तरंगताना आढळला. त्यांनतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला पण त्यास मुंडके नव्हते. विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आधार कार्डवरच्या पत्तानुसार पोलिसांनी येथे संपर्क साधला असता वाढवना येथील एक तरुण मागील काही दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. निलंगा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...