आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजव्या कालव्यात आणखी एका युवकाचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - पाण्यामधील वीज मोटार  सुरू करण्यासाठी उजव्या कालव्यात उतरलेला तरुण पाय घसरल्याने कालव्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता गैबीनगर तांडा येथे घडली. विलास साहेबराव राठोड ( २७, रा. तळणेवाडीतांडा ) असे मृत युवकाचे नाव आहे.   


१३ मे रोजी गेवराई तालुक्यातील गंगावाडीजवळून गेलेल्या पैठणच्या  उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन  शाळकरी मुलांचा वाहून जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तिसऱ्या दिवशी याच तालुक्यात तळणेवाडी  परिसरात आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.  गयबी नगर तांडा येथील शेतकऱ्यांबरोबर विलास राठोड हा गयबी नगरवरील पॉइंटची विजेची मोटार सुरू करण्यासाठी कालव्यात उतरला तेव्हा पाण्याच्या वेगाने वाहून जात तो बुडाला. पुन्हा वर न आल्याने तिथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. युवकाचा पाण्यामध्ये शोध घेतला असता पाच तासानंतर राठोड याचा मृतदेह गयबी नगर तांडा येथील शिडीचा पूल येथे सापडला. मृत युवकाच्या त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...