आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंटबाजी अंगलट; चालत्या रेल्वेतून पडून युवक जखमी, रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- चालत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे एका युवकाच्या अंगलट आले. रेल्वेच्या खिडकीला लटकून स्टंट करताना चालत्या रेल्वेतून पडून युवक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पानगाव - घाटनांदूरदरम्यान घडली. दरम्यान, रेल्वे पोलिसांची वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. 


रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश हरिभाऊ खरात (रा. आखाडा बाळापूर, जि. हिंगोली) हा परळीकडे येणाऱ्या नांदेड-बंगलोर रेल्वेतून प्रवास करत होता. चालत्या रेल्वेत तो खिडकीला लटकून स्टंटबाजी करत होता. याचदरम्यान तो खाली पडून जखमी झाला. पानगाव - घाटनांदूरदरम्यान चोपनवाडी शिवारात ही घटना घडली. घाटनांदूर येथील पोलिस मित्र खुद्दूस खलील शेख यांनी रेल्वे पोलिस सुभाष चोपडे यांच्याशी संपर्क साधून जखमी युवकाची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन त्याला रुग्णालयात दाखल केल्याने युवकाचे प्राण वाचले. उपचारानंतर त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. 


रेल्वेत स्टंट नकाे 
चालत्या रेल्वेत प्रवाशांनी स्टंटबाजी करू नये. यामुळे जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 


स्टंटबाजीचा व्हिडिओ 
सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश खरात स्टंटबाजी करत असताना इतर प्रवाशांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली होती. स्टंटबाजीचा हा व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...