आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो Stunt नव्‍हता...आईमुळे लटकला होता रेल्‍वेला, युवकाने सांगितली व्‍यथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - 12 जुलैरोजी नांदेड-बंगळुरू एक्‍सप्रेसच्‍या खिडकीला लटकून एक युवक खाली पडला होता. याचा व्हिडिओही नंतर सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता. अनेकांनी ही स्‍टंटबाजी असल्‍याचे सांगितले होते. तर प्रशासनानेही अशी स्‍टंटबाजी न करण्‍याचे आवाहन या घटनेनंतर केले होते. मात्र हा स्‍टंट नसल्‍याचे या युवकाने आता म्‍हटले आहे. या घटनेत युवक गंभीररीत्‍या जखमी झाला होता. 


हे होते कारण 
प्रकाश हरिभाऊ खरात (30) असे या युवकाचे नाव आहे. तो कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर येथील रहिवासी आहे. बुट पॉलिश करून तो आपला उ‍दरनिर्वाह करतो. या घटनेविषयी त्‍याने सांगितले की, '4 दिवसांपूर्वी बुटपॉलिश करण्‍याकरीता मी वसमत येथून लातूरला गेला होतो. त्‍यादरम्‍यान आईची तब्‍येत बरी नसल्‍याने घरी ये, असा फोन मला आला. त्‍यामुळे मी ताबडतोब रेल्‍वेस्‍टेशनवर आलो. मात्र तोपर्यंत हैदराबाद-बंगळुरू ट्रेन पुढे निघाली होती. मी धावत कशीतरी खिडकी पकडण्‍यात यशस्‍वी झालो. मात्र तोपर्यंत ट्रेनची गती वाढली होती. मी डब्‍ब्‍यातील प्रवाशांना चैन ओढून गाडी थांबविण्‍याची विनंती केली, मात्र कोणीही ऐकले नाही. उलट सर्वजण जण शुटिंग करत राहिले.'


यामुळे वाचला जीव 
युवकाने पुढे सांगितले की, 'कोणीही रेल्‍वेतील चैन ओढत नाही. सर्वजण केवळ शुटिंग काढत आहेत. अशात ट्रेनची स्‍पीड आणखी वाढली तर आपले काही खरे नाही, अशी खात्री पटल्‍यानेच आपण खिडकी सोडली.' त्‍यानंतर सुदैवाने युवक रेल्‍वे पटरीच्‍या बाजूला पडला. यामध्‍ये तो गंभीर जखमी झाला होता. काही जणांनी लातूर येथील रुग्‍णालयात त्‍याला दाखल केल्‍याने सुदैवाने तो वाचला. गाडीची गती मध्यम असताना त्याने उडी मारण्याचा घेतलेला निर्णयच त्याला जीवदान देवून गेला आणि आज तो घरी सुखरूप आहे. त्याची आई सुद्धा मुलगा वाचला असल्याने आनंदाश्रु ढाळत आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...  
 

 

बातम्या आणखी आहेत...