आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: चाकुने भोसकून युवकाचा खून, शहरात आठवड्यातील दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - शहरातील प्रितीसुधानगर येथे चाकुने भोसकून युवकाचा खून करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. निलेश अनिल कराळे असे मृताचे नाव आहे. तर यात अन्य एकजण जखमी झाला आहे. दरम्यान शुक्रवारी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणला. सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसांनी एकास ताब्यात घेतले तर अन्य तिघांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले होते.


एका मित्राच्या वाढदिवसावरुन परतल्यानंतर निलेश कऱ्हाळे व यश भुरेवाल हे दोघे प्रतिसुधानगर येथील गेट क्रमांक तीन जवळ थांबले होते. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर चाकुने वार केला. त्यावेळी पोटावर व मानेवर चाकुचे वार झाल्याने गंभीर जखमी होऊन निलेश उर्फ बाबु अनिल कराळे (१८, नळगल्ली, जालना) हा जागेवरच कोसळला व त्याचा मृत्यू झाला. तर यश कन्हैय्यालाल भुरेवाल (कालीकूर्ती, जालना) हा जखमी झाला.


शुक्रवारी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी निलेशच्या नातेवाईकांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. १२.३० वाजता नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय राजेंद्रसींह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पीआय महादेव राऊत यांनी नातेवाईकांची समजूत काढली व यातील सर्व आरोपींना अटक करण्याचा शब्द दिल्यानंतर मृतदेह नळगल्ली येथे नेण्यात आला. दरम्यान यावेळी जमावातील काही युवकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर हल्ला चढवला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला.

 

चौघांना घेतले ताब्यात

याप्रकरणी निलेशचे वडिल अनिल विष्णुपंत कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंगल ठाकुर, अमोल शिंदे, लक्ष्मण गाेरे, आकाश शिंदे या चार युवकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मंगल ठाकुर यास ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित आरोपींच्या मागावर पोलिस पाठविण्यात आले आहेत. यातील आरोपींचा खून प्रकरणात काय संबंध आहे, यापैकी खून कोणी केला, गुन्ह्यात कोणते हत्यार वापरले, याचा पोलिस शोध घेत आहेत. खुनाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पीआय महादेव राऊत यांनी सांगीतले.

 

वाहनांची केली तोडफोड

शुक्रवारी दुपारी निलेशचा मृतदेह बाजार पोलिस ठाण्यात आणला तेव्हा नातेवाईक व निलेशच्या मित्रांची मोठी गर्दी झाली होती. याचवेळी जमावातील काहींनी रस्त्यावर उभ्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. यात जवळपास सहा वाहनांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. तर जमावाने एका दुकानाच्याही काचा फोडल्या.


आठवड्यातील दुसरी घटना

22 जून रोजी शहरातील विशाल कॉर्नर भागात तिहेरी प्रेमप्रकरणातून कृष्णा शिरसाठ या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली हाेती. याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान शहरात आठ दिवसातच खुनाची ही दुसरी घटना घडली. याच कालावधीत जिल्ह्यात खुनाच्या चार घटना घडल्या आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज, वाहनांची करण्‍यात आलेली तोडफोड...

 

बातम्या आणखी आहेत...