आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून परभणीत चार बसेस फोडल्या, एसटी महामंडळाकडून वाहतुक बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर युवकांच्या एका गटाने आक्रमक भुमिका घेत आज शुक्रवारी शहरातील एसटी महामंडळाच्या 4 बसेसवर दगडफेक केली. यामध्‍ये या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत या बसेस पोलिस ठाण्‍यामध्‍ये दाखल केल्‍या. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्‍यात आली नाही.

 

दगडफेकीमुळे एसटी स्‍थानकांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्‍यामुळे महामंडळाने दुपारी 1 वाजल्यापासून मध्यवर्ती बसस्थानकांमधून बसेस सोडणे बंद केले आहे. पोलिसांचाही मोठा फौजफाटा स्‍थानकांवर तैनात करण्‍यात आला आहे.

 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने आगामी आंदोलनाची दिशा ठरविली जात आहे. त्यातच शुक्रवारी युवकांनी या प्रश्‍नांवर तीव्र आंदोलन करण्याची भुमिका घेत सकाळी 11 वाजल्यापासून वसमत रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी केली व एसटी बसेसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. युवकांनी प्रथम वसमत रस्त्यावर सावली विश्रामगृहासमोर हिंगोली आगाराच्या हिंगोली ते परभणी येणार्‍या बसवर (एम.एच.20-बी.एल.2318) दगडफेक करित समोरील बाजुच्या काचा फोडल्या. त्या पाठोपाठ शिवशक्ती अपार्टमेंटसमोर एका बसवेर दगडफेक करण्यात आली. दुपारी 12 च्या सुमारास शिवाजी महाविद्यालयासमोर वसमत आगाराच्या परभणी ते वसमत जाणार्‍या (एम.एच.14-एस.टी.1363) वर दगडफेक केली. दुपारी 1 च्या सुमारास परभणी-जिंतूर जाणार्‍या बसवर विसावा कॉर्नर येथे युवकांच्या गटाने एका बसवर (एम.एच.20-बी.एल.621) दगडफेक केली.


मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करित बसच्या समोरील व मागील काचांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काचा फुटून मोठे नुकसान झाले. चालकांनी त्या-त्या ठिकाणी बसेस थांबून प्रवाशांना अन्य बसेसमध्ये बसून दिले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून या बसेस पोलिस ठाण्यामध्ये जमा केल्या. दरम्यान पाठोपाठ चार बसेसवर झालेल्या दगडफेकीने बसस्थानकांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...