आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाच्या ट्रॉलीवर कार धडकून तिघे जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- वसमत शहराजवळ जिंतूर पाटीवर असलेल्या मयूर बिअर बारजवळ शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव कारने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की कारचा समोरील भाग आणि कारमधील तिघांचाही चेंदामेंदा झाला. मृत तिघेही जिंतूर तालुक्यातील आसेगावचे आहेत. 


जिंतूर येथील गणेश पिराजी गुंजकर (३२) , सोपान एकनाथ पवार ( ३५), दत्ता सुंदर पवार (३५) हे तिघे गुरुवारी शेतजमिनीच्या व्यवहारासंदर्भात नांदेडला गेले होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघेही नांदेडकडून जिंतूरकडे मारुती स्विफ्ट कारने येत होते.  त्यांची   स्विफ्ट कार (एमएच-२२ यू-६४७९) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वेगाने आदळली. कार चालकाला रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रॉलीचा अंदाजच आला नसल्याने कार  ट्रॉलीवर आदळल्याने कारचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.  या भीषण अपघातात तिघांच्याही शरीराचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती कळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे पीआय उदयसिंग चंदेल यांच्या पथकाने   घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने सुरू केलेल्या बचाव कार्यात तिघांचेही मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले.   याबाबत चालक गणेश गुंजकर यांच्यावर भरधाव वाहन चालवून स्वतःच्या व इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...