आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने केले;भररस्त्यात विष प्राशन.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. शिवाजी बाबासाहेब घंडगे (५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


शिवाजी घंडगे हे पाथरगव्हाण येथे पत्नी, ३ मुली व २ मुलांसोबत राहतात. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे. गावाशेजारीच त्यांची ८ एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वी शेतीवर त्यांनी एसबीआयकडून २ लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते.   दोन वर्षात   शेतीतून काही उत्पन्न मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिघडली. बोंडअळीने  कापशीचे उत्पादन झाले नाही. यासोबतच त्याच्या विम्याची रक्कमही त्यांना मिळाली नाही. गतवर्षी त्यांना १८ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला होता. मात्र, जिल्हा बँकेने ती रक्कम कर्ज खात्यात जमा करून घेतली. यातच त्यांना मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होती.याच विंवचनेत रविवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घंडगे घरातील विषारी द्रव्याचा डबा घेऊन रस्त्यावर आले. रस्त्यावर उभ्या असलेल्या काही ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली. मात्र कोणाला काही कळायच्या आतच त्यांनी ते द्रव्य प्राशन केले. यानंतर त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच मध्यरात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...