आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग करणा-या पाच जणांना पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद-  वीस कोटी रुपयांचा बनावट धनादेश आयसीआयसीआय बँकेत क्लिअरिंगसाठी देऊन ४ कोटी रुपयांची रक्कम उचलल्याप्रकरणी आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची पाळेमुळे खोदताना आर्थिक गुन्हे शाखेने फुलाई मल्टिस्टेटचे चेअरमन मारुती खामकर व बीड येथील सय्यद, नरेश मनोहर राठोड, धीरज धर्मराज कोळी, वैभव कोटेचा या चौघांना गजाआड केले असून त्यांना गुरुवारी (दि.१४) न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


उस्मानाबाद येथील फुलाई मल्टिस्टेट क्रेडिट को. ऑप सोसायटीचे आयसीआयसीआय बँकेच्या उस्मानाबाद शाखेत चालू खाते आहे. या खात्यावर मल्टिस्टेटचे सीईओ प्रदीप मारुती खामकर व विकास भाटिया या दाेघांनी मल्टिस्टेटच्या खात्यामध्ये हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया कंपनी बंगळुरूचा २० कोटी रुपयांचा बनावट धनादेश६ डिसेंबर रोजी क्लिअरिंगसाठी जमा केला होता. धनादेश क्लीअर होऊन रक्कमही फुलाईच्या खात्यावर जमा झाली.  यातील ४ कोटी रुपये उचलण्यात आले. दरम्यान, सदरील धनादेश बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आयसीआयसीआय बँकेची एकच धावपळ उडाली आणि याप्रकरणी चार दिवसांपूर्वी आनंदनगर पोलिस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...