आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निझामाच्या वंशजांनी घेतली प्रदेशाध्यक्ष खा. दानवेंची भेट; सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- हैदराबाद येथील निझामाच्या वंशजांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. भोकरदन येथील खासदार दानवे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे नवाबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.   


जालना येथील इक्बाल पाशा यांच्यासोबत हे नवाब येथे आले. भोकरदन येथील शेख हमद यांनी या भेटीचे नियोजन केले व खासदार दानवे यांची भेट घेतली. या नवाबांमध्ये निझामाचे वंशज नवाब नजफ अली, नवाब करमअली खान,नवाब हबीब अलीखान, नवाब अनसअली यांचा समावेश होता. या वेळी नवाब नजफ अली व त्यांच्या बंधूंनी खासदार दानवेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. या वेळी त्यांनी दानवे यांना चांदीच्या चारमिनारची प्रतिकृती भेट दिली. या वेळी त्यांनी जुन्या व नव्या राजकीय विषयावर चर्चा केली. जवळपास अर्धा तास ही बैठक सुरू होती. यात इक्बाल पाशा यांनी शेरोशायरी करून बैठकीत रंगत आणली, तर खासदार दानवे यांनीही नवाबांचे यथोचित स्वागत केले. खासदार दानवेंचे साधे राहणीमान, बंगल्यावर आलेल्या सर्वसामान्य जनतेच्या कार्यकर्त्याच्या भेटीगाठी,आपुलकीचे बोलणे व सहज काम करण्याची पद्धत आपल्याला भावली, असे या नवाबांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...