आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ वर्षांपूर्वी चोरी झालेल्या मूर्ती सापडल्या, आता त्याच मूर्ती चोरट्यांनी रातोरात पळवल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - तालुक्यातील रिधोरी येथील  पुरातन राम मंदिरातील  २८ मूर्तींपैकी १३ मूर्ती  रविवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  रविवारी सकाळी  उघडकीस आली. पुजारी पूजेसाठी  मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आली आहे. दरम्यान आठ वर्षांपूर्वी याच मंदिरातून चोरट्यांनी १३ मूर्ती  चोरट्यांनी पळवल्या होत्या. चोरट्यांना काही तासांतच पोलिसांनी जेरबंद केले होते. मात्र आता पुन्हा चोरट्यांनी याच मंदिरातून १३ मूर्ती पळवल्याने खळबळ उडाली आहे.  


माजलगाव शहरासह  ग्रामीण भागात चोरांचा धुमाकूळ सुरूच असून  दोन दिवसांपूर्वी  मंजरथ येथे  भर दिवसा चोरी झाली.  शनिवार  २१ एप्रिल  २०१८ रोजी रात्री  माजलगाव तालुक्यातील रिधोरी येथील राम मंदिरात  चाेरीची घटना घडली. येथील पुजारी गंगाराम रामदासी  हे आजारी असल्याने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. 

 

रविवारी सकाळी ते  रिधोरीकडे परतत असताना वाटेत त्यांना  राम मंदिरात चोरी झाल्याचा ग्रामस्थांचा फोन आला.    सकाळी काही भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराचे गेटचे   दोन कुलूप तुटल्याचे दिसले.  यानंतर रिधोरी  ग्रामस्थांनी माजलगाव ग्रामीण  पोलिस ठाण्यात धाव घेतली.  एकुण २८ मूर्तींपैकी  १३  मूर्ती पंचधातु, तांबे, पितळेच्या पुरातन मूर्ती  आहेत. या प्रकरणी रामदासी  यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून  अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान बीड येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 


अकरावी पिढी रामसेवेत 

रिधोरी येथील राम मंदिराचे पुजारी गंगाधर पुजारी यांची सध्या अकरावी पिढी राम मंदिराची पूजा करत आहेत. गावातील हे रामाचे मंदिर पुरातन असून येथे दरवर्षी रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 

 

आठ वर्षांपूर्वीही झाली होती याच मंदिरात चोरी

रिधोरीतील राम मंदिरातून  २००१ मध्ये १३ मूर्ती  चोरट्यांनी लांबवल्या होत्या.   चोरटे  दुचाकीवर माजलगाव शहरात फिरत असताना मध्यरात्री पोलिसांनी त्यांना अटक  केली हाेती.  त्यांच्याकडे या मूर्ती सापडल्या होत्या.   या मूर्ती न्यायालयात जमा केल्यानंतर न्यायालयाने या मूर्ती परत  पुजाऱ्यांना दिल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...